
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मुंबई | आगामी विधानसभा निवडणुका आणि २६/११ च्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. १ नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६३ च्या अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हा प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय महाराष्ट्रातील २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. यावेळी विविध वीआयपी व्यक्तींची उपस्थिती राहणार असून, सार्वजनिक ठिकाणी संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलले आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की या आदेशाचे पालन अनिवार्य आहे. जर कोणाला या उडणाऱ्या वस्तूंचा वापर करताना आढळले, तर भारतीय दंड संहिता २२३ अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.