महापे सर्कलजवळ ड्युटीवर असलेल्या पोलिस हवालदाराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू; चालक अटकेत

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jul 24, 2025

अरुण गुप्ता

नवी मुंबई | महापे सर्कलजवळ गुरुवारी सकाळी वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलिस हवालदाराचा जेसीबी मशीनखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार सकाळी ड्युटीवर वाहतूक नियंत्रण करत असताना एक जेसीबी अनियंत्रित होऊन त्यांच्यावर धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी जेसीबी चालक राजेश गौंड याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस संघटनांकडून संताप व्यक्त केला जात असून, भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.