मुंबई एयरपोर्ट पर बड़ा हादसा टला
- Feb 04, 2026
नवी मुंबई | अदावली–भुतवली परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग बेकायदेशीररीत्या उभारलेल्या गोदामात लागली असून, गोदामात साठवण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या अनेक बाटल्यांना आग लागल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, बेकायदेशीर गोदामाबाबत चौकशी सुरू आहे.
(बातमी अपडेट होत आहे…)