महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल टार्गेट लर्निंग वेंचर्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध

  • Admin
  • महाराष्ट्र
  • May 03, 2025

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC (बारावी) आणि SSC (दहावी) 2025 चा निकाल लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील टार्गेट लर्निंग वेंचर्स प्रा. लि. ( Target publication ) या खाजगी प्रकाशन संस्थेच्या संकेतस्थळावरून आपला निकाल पाहू शकणार आहेत.

टार्गेट लर्निंग वेंचर्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सहकार्याने बारावी व दहावीचे निकाल आपल्या संकेतस्थळावरुन जाहीर करणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे .टार्गेटच्या या उपक्रमामुळे बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील संभाव्य तांत्रिक अडचणी व अतिरिक्त ताण टाळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी त्यांचे  HSC व SSC चे निकाल टार्गेट लर्निंग वेंचर्सच्या https://results.targetpublications.org या संकेतस्थळावर पाहू  शकतील.

मागील वर्षी संस्थेच्या संकेतस्थळावरून २ लाखांहून अधिक HSC आणि ३ लाखांहून अधिक SSC विद्यार्थ्यांनी अवघ्या 0.04 सेकंदात यशस्वीरीत्या निकाल पाहिला.

यंदाच्या HSC  लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून  घेण्यात आल्या, त्यामध्ये राज्यभरातील 15 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर SSC परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, ज्यात 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. HSC  चा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत. त्यासोबतच टार्गेट लर्निंग वेंचर्सच्या   https://results.targetpublications.org या संकेतस्थळावर देखील निकाल पाहता येणार आहे.

टार्गेट लर्निंग वेंचर्स प्रा. लि. चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप गंगारमानी यांनी सांगितले, “ टार्गेट लर्निंग वेंचर्स ही संस्था शैक्षणिक नवकल्पनांमध्ये  सदैव अग्रेसर राहिली आहे.निकाल जाहीर होताच विद्यार्थी आमच्या संकेतस्थळावरून  निकाल जलद आणि अचूक पाहू शकतील, याची खात्री आम्ही देतो.महाराष्ट्र राज्य मंडळाने आमच्या तांत्रिक क्षमतेवर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली याबद्दल आम्ही आभारी आहोत." 

निकाल पाहण्यासाठी पायऱ्या:

1. https://results.targetpublications.org या वेबसाइटला भेट द्या.

2. हॉलतिकीट क्रमांक टाका.

3. निकाल डाउनलोड करून प्रिंट घ्या. Me hu

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:

https://mahresult.nic.in/,

https://results.targetpublications.org