मुंबई एयरपोर्ट पर बड़ा हादसा टला
- Feb 04, 2026
अजित पवारांच्या आयुष्याशी जुळलेले दुर्दैवी आकड्यांचे योगायोग
पुणे–बारामती परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीकडे येत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे.
राजकारणात ठाम भूमिका, बुलंद आवाज, रोखठोक व्यक्तिमत्त्व आणि पुण्याचे पालकमंत्री अशी ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती विविध सूत्रांकडून दिली जात आहे.
या घटनेनंतर अजित पवारांच्या आयुष्याशी संबंधित काही दुर्दैवी आकड्यांचे योगायोग चर्चेचा विषय ठरत आहेत.
आकड्यांचा विलक्षण योगायोग
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला होता. विमान अपघाताची तारीख 28 जानेवारी 2026 सांगितली जात आहे. या हिशोबाने त्यांचे वय 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस इतके ठरते.
विशेष म्हणजे, अजित पवार यांनी आतापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. वय आणि राजकीय कारकिर्दीतील हे आकडे एकत्र येत असल्याने हा योगायोग अनेकांच्या लक्षात येत आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगसाठी येत होते. त्यावेळी पुणे–बारामती परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता (Visibility) कमी होती.
वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी न झाल्याने ‘गो-राऊंड’ घेण्याचा निर्णय घेतला. गो-राऊंड म्हणजे धावपट्टीला स्पर्श न करता पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरप्रयत्न करणे.
दुसऱ्या प्रयत्नादरम्यान, धावपट्टी क्रमांक 19 जवळ येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताच्या वेळी कोण होते विमानात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानात पुढील व्यक्ती उपस्थित होत्या—
उपमुख्यमंत्री अजित पवार
सुरक्षा रक्षक विदीप जाधव
फ्लइट अटेंडंट पिंकी माळी
अनुभवी पायलट सुमित कपूर
सह-पायलट शांभवी पाठक
अपघाताचा क्रम काय? (सूत्रांच्या माहितीनुसार)
बारामती विमानतळ लहान असून तेथे ILS (Instrument Landing System) सुविधा उपलब्ध नाही
दाट धुक्यामुळे वैमानिकाला मॅन्युअल आणि व्हिज्युअल लँडिंगचा प्रयत्न करावा लागला
पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर विमानाने मोठे वळण घेतले
दुसऱ्या प्रयत्नादरम्यान वैमानिकाने MAYDAY कॉल जारी केला
डीजीसीएच्या सूत्रांनुसार, ही टेबल-टॉप धावपट्टी आहे
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचे संतुलन बिघडले
रनवेवर पोहोचण्यापूर्वी विमान जमिनीवर आदळले
धडकेनंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने विमानाला वेढले
आगीमुळे तात्काळ बचावकार्य करणे शक्य झाले नाही
सध्या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून अंतिम कारण डीजीसीएच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.