12 वी नापासाचा बोगस सहाय्यक आयुक्त म्हणून गुन्हा दाखल

नवी मुंबई | एरोली परिसरातील ३५ वर्षीय युवकाने स्वतःला परराष्ट्र मंत्रालयाचा सहाय्यक आयुक्त म्हणून दाखवून लोकांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. हा युवक प्रत्यक्षात बारावी नापास असून, त्याने खोट्या नावाने ओळख सांगून अनेक ठिकाणी वावरण्याचा प्रकार उघड झाला आहे.

रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका दुकानातून बनावट सहाय्यक आयुक्त ओळखपत्र मिळाले आहे. या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सध्या रबाळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अजून किती जण बोगस ओळखपत्रांचा वापर करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाखाली वावरत आहेत आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत का याचीही चौकशी सुरू आहे.