
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई।रबाळे परिसरातील गट क्रमांक 211 येथे मनोज कोरी या व्यक्तीने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या साठी रस्ता खोदून अनधिकृत बांधकाम सुरू केल्याचे उघड झाले आहे. मनोज कोरी या व्यक्तीस निळ्या शर्टमध्ये जागेवर सुपरवायझिंग करताना पाहण्यात आले.
सदर रस्ता हा नऊ मीटर असून, स्थानिक अधिकाऱ्यांनी या अनधिकृत इमारतीच्या बांधकामासाठी सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. सिडकोचे अतिक्रमण अधिकारी भरत ठाकुर यांनी सिडकोकडे या जमिनीचा ताबा घेण्याबाबत दिलेल्या पत्राला देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे.याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.