
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई | वाशी सेक्टर १४ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये पाण्याच्या टाकीत पडल्याने आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी एडीआर (अप्राकृतिक मृत्यू) दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेच्या वेळी गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने मनपाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि संघटनांनी ठेकेदारासह मनपा अधिकारी आणि सुरक्षा सुपरवायझरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शनिवारी रात्री वाशी सेक्टर १४ मधील पालवे गार्डनमध्ये दिवाळीमुळे गर्दी होती. याच वेळी, सिद्धार्थ विशाल उघडे (८ वर्षे) नावाचा मुलगा अचानक गायब झाला. शोध घेतल्यावर गार्डनमधील पाण्याच्या भूमिगत टाकीचे झाकण उघडे दिसले, आणि त्यात सिद्धार्थ पडलेला आढळला. त्वरित रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने मनपाच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मनपा अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी
पश्चिम महाराष्ट्र एकता मंचाचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी गार्डनमधील सुरक्षा रक्षक गायब होते, आणि सुपरवायझर अक्षय म्हात्रेने दुसरा गार्ड का तैनात केला नाही, हा प्रश्न गंभीर आहे. या घटनेसाठी ठेकेदार, सुपरवायझर आणि संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंचाने मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे. तसेच, दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे, आणि मनपाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.