मुंबई मंत्रालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी-उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण बैठक

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 14, 2025

मुंबई।आज मंत्रालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक वन मंत्री गणेश नाईक सोबत पार पडली. या बैठकीत कात उद्योजकांच्या समस्या, खैर वृक्ष संवर्धन, वणवा नियंत्रण, वानर आणि हत्तीचा उपद्रव यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

बैठकित कॅबिनेट मंत्री  नितेशजी राणे, राज्यमंत्री  योगेशजी कदम, तसेच आमदार  भास्कर जाधव,  दीपकजी केसरकर, शेखरजी निकम, ज्ञानेश्वरजी म्हात्रे आणि निरंजनजी डावखरे यांनी सहभाग घेतला. यासोबतच वन विभागातील अधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते.या बैठकीत शेतकरी व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.