ब्रेकिंग..सैफ अली खान यांच्या घरी चोरी, चाकू हल्ल्यात किरकोळ जखमी,तीन संदिग्ध ताब्यात

  • Admin
  • मुंबई
  • Jan 16, 2025

मुंबई।बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या बांद्रा वेस्ट येथील घरी गुरुवारी पहाटे २:३० वाजता चोरीची मोठी घटना घडली. चोरी दरम्यान सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना किरकोळ जखम झाली आहे. त्यांना चाकू आधी मारण्यात आला की झटापटीत ते जखमी झाले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे. चोरट्यांनी घरातून नेमके काय चोरले याचा तपास सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे.घटनेबाबत अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.