नवी मुंबईत अवैध बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांचा धडक कारवाई; ७ जण अटकेत, २६५ जणांची चौकशी

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 26, 2025

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात, विशेषतः बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार बुधवारी पहाटे ३.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत २६५ संशयितांची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये ७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

क्राईम ब्रँचला माहिती मिळाली होती की, तुर्भे स्टोअर, नेरुळ आणि खंडेश्वर भागात काही बांगलादेशी नागरिक राहतात. या माहितीनुसार पेंधर गाव, तळोजा, खारघर, नेरुळ, वाशी, सारसोळ, कामोठे, कळंबोली यासह १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तुर्भे पोलीस ठाणे: ४ बांगलादेशी नागरिक अटकेत

नेरुळ पोलीस ठाणे: १ बांगलादेशी नागरिक अटकेत

खंडेश्वर पोलीस ठाणे: २ बांगलादेशी नागरिक अटकेत

याशिवाय, या बांगलादेशी नागरिकांना आधार देणाऱ्या २ भारतीय नागरिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात उघड झालेली माहिती:

गिरफ्तार झालेले बांगलादेशी नागरिक गेल्या ५ ते २० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांनी फसवणूक करून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून भारत सरकारची फसवणूक केली होती.या कारवाईचा उद्देश नवी मुंबईतील अवैध रहिवाशांवर नियंत्रण ठेवणे व सुरक्षेला बळकटी देणे आहे. पुढील तपास सुरू आहे.

- वार्ताहर