
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई। देशातील स्वच्छतेत आघाडीवर असलेल्या नवी मुंबईसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आजपासून शहरातील सफाई कर्मचारी आपल्या प्रलंबित वेतनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही त्यांच्या वेतनवाढीचा निर्णय लागू करण्यात आलेला नाही.
"वेतन वाढले नाही तर आमचा जीवनमान कसे सुधारणार? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवणार?" असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शहरातील कचरावेचक आणि साफसफाईच्या कामांवर परिणाम होत असून, नागरिकांना स्वच्छतेच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने यावर तोडगा काढावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. आता सर्वांचे लक्ष या आंदोलनावर आणि सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.