बांगलादेशी नागरिक आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा - वपोनि ब्रह्मनंद नाईकवडे

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 16, 2025

 नवी मुंबई :- नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी नेरुळ पोलीस ठाणे मध्ये तात्काळ समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे आवाहन नेरुळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्राह्मनंद नाईकवडे यांनी केले आहे.

            नवी मुंबई पोलीस हद्दीत विना परवानगी परदेशी नागरिक आणि बांग्लादेशी नागरिक आढळून आल्यास त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाणे प्रशासनाना दिले आहेत.

          नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाची दखल घेत नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतील सारसोळे, शिरवणे, नेरुळ, जुईपाडा, कुकशेत, दारावे आदि गावातील ग्रामस्थांनी अधिक भाड्याच्या अमिषापोटी परदेशी वा बांगलादेशी नागरिकांना भाड्याने ठेऊ नये, नेरुळ पोलीस ठाणे हद्दीतील संबंधित बिल्डर्स यांनी आपल्या बांधकाम साईटवर तसेच लेबर कॅम्प मध्ये अशा नागरिकांना ठेऊ नये तसेच सामान्य नागरिकांनी घरकाम, हॉटेलमध्ये वेटर वा अन्य ठिकाणी बांगलादेशीना ठेऊ नये. आपल्या देशाला घोका निर्माण करणारे परदेशी तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करुन राहत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा एखाद्या संबंधित व्यक्ती विषयी संशय आल्यास जागृत नागरिकांनी तात्काळ नेरुळ पोलीस ठाणे मध्ये समक्ष येऊन अथवा फोन द्वारे माहिती द्यावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्राह्मनंद नाईकवडे यांनी कळविले आहे.