
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
भारत समाचार टीवी डिजिटल
विराज पाटील
नवी मुंबई | शीलफाटा रोडवर म्हापेजवळ शनिवारी दुपारी ट्रक आणि टेम्पोची भीषण धडक झाली. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
भारत समाचार टीवी प्रतिनिधी नी माहिती घेतल्यावर अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चालक तासन्तास वाहनाच्या आत अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच त पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर चालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी चालकाला वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.