इमेजिका पिकनिकदरम्यान नवी मुंबई मनपा शाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 26, 2025

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ( NMMC ) घणसोली येथील शाळेच्या वतीने मंगळवारी विद्यार्थ्यांसाठी खोपोली इमेजिका ( imagica ) येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सहलीदरम्यान आठवीतील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव आयुष सिंग असे आहे.

या घटनेनंतर खोपोली पोलिसांनी एडीआर दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्यापासून पालिका प्रशासन आणि शाळेचे कोणतेही अधिकृत प्रतिनिधी यावर बोलण्यास तयार नाहीत.