
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबईत जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; एलआयजी-ईडब्ल्यूएस रहिवाशांच्या प्रश्नांवर तत्काळ निर्णय
नवी मुंबई । आज नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्याचे वनमंत्री आणि नवी मुंबईचे मार्गदर्शक नेते गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तिसरा जनता दरबार पार पडला. या दरबाराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या.या दरम्यान गणेश नाईक यानी सिडको अधिकारी याना सुनावत म्हणाले की खड्ड्यात गेलं मंत्रीपद, खड्ड्यात गेली आमदारकी, खड्ड्यात गेली सत्ता — पण जर नवी मुंबईतील नागरिकांना, विशेषतः 2015 पूर्वीच्या घरांना, सिडको किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीसा मिळत असतील, तर हा गणेश नाईक या सर्व नागरिकांसाठी रस्त्यावर उतरेल. मी कोणाच्याही मागे-पुढे पाहणार नाही.इथे उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी हे नीट लक्षात ठेवावं, आणि जे अधिकारी इथे नाहीत त्यांना देखील हे ठणकावून सांगा — नागरिकांना त्रास दिला तर मी स्वस्थ बसणार नाही!
या जनता दरबारात सिडको निर्मित एलआयजी आणि ईडब्ल्यूएस कॉलनीतील गरजेपोटी झालेल्या बांधकामांना नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांचा विषय प्रमुखत्वाने चर्चेला आला. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी या नोटिसांविषयी नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रहिवाशांच्या भावना लक्षात घेऊन, वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत गरजेसाठी झालेल्या बांधकामांवर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
"जनतेच्या सेवेसाठी, न्यायासाठी आणि त्यांच्या विश्वासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.