कै.राजीव गांधी उड्डाणपुलाखाली बेकायदा वाहन पार्किंग

  • Admin
  • नवी मुंबई
  • Apr 25, 2025

नवी मुंबई :- नेरूळ( पूर्व )सेक्टर 3 मधील कै.राजीव गांधी उड्डाणपुलाली सर्रास बेकायदा वाहन पार्किंग केली जात असल्याचे आढळून येते .नेरुळ विभागात बँकासमोर काही मिनिटांसाठी उभ्या केलेल्या वाहनावर वाहतूक विभागाचे टोइंग व्हॅन त्वरित कारवाई करत असते.मात्र चोवीस तास इथं उभ्या असणाऱ्या वाहनावर कारवाई का करीत नाही असा सवाल वाहन चालक करीत आहेत .


        नेरुळ विभागातील पूर्व भागात सेक्टर 3 शिरवणे गाव शेजारी कै. राजीव गांधी उड्डाणपुल आहे .या उड्डाणपुलाच्या खाली रासरोजपणे दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असलेली पहावयास मिळतात .मात्र या बेकायदा उभ्या केलेल्या वाहनावर नवी मुंबई वाहतूक विभाग कारवाई करत असल्याचे कधीही निदर्शनास येत नाही .इथं दिवसभर पार्क करून ठेवलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो . नवी मुंबई मनपा परिवहन सेवेची बस क्र 21 येथून शिरवणे मार्गे वाशीकडे मार्गक्रमण करीत असते या बसेस सह मोठ्या वाहनांना वळसा घालण्यास तारेवरची कसरत करावी लागते .

स्टेशन परिसर , विविध बँकासमोर काही मिनिटांसाठी पार्क करून ठेवलेल्या दुचाकी वाहनावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन तात्काळ वेळ न दवडता झडप घालते मग इथं कै.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली पार्क करून ठेवलेल्या वाहनावर कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित होत आहे .

-------------------------------------------


आम्ही नवी मुंबई शहरवाशी असून करदाते आहोत .हॉटेल वा बँकेत काही कालावधी साठी रस्त्यावर उभ्या केलेल्या आमच्या वाहनावर वाहतूक विभाग कारवाई करते तसेच चारचाकी वाहनाला जामर लावते तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर वाहने उभी केलेली असताना कार्यवाही केली जात नाही .

नारायण शिंदे 

वाहन चालक, नेरुळ