माथेरान मध्ये राजकीय भूकंप!

  • Admin
  • रायगड
  • Oct 24, 2024

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सामूहिक राजीनामा

मिलिंद कदम 

 माथेरान।  विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतात वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत पक्ष बदलाचे वारे जोरदार वाहत असताना त्याचा फटका थंड हवेच्या माथेरानलाही बसला असून आज माथेरान मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामा दिला असून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. 

                 कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या यादीमध्ये श्री नितीन सावंत यांचे नाव जाहीर झाल्यानंतर माथेरान मधील शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर होता व त्यातूनच हे राजीनामा नाट्य घडल्याचे दिसून येत आहे. विद्यमान आमदार श्री महेंद्र थोरवे व नितीन सावंत यांच्यामध्ये थेट लढत होत आहे व माथेरानचे माजी नगरसेवक श्री प्रसाद सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये या राजीनामा नाट्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली कर्जत मध्ये झालेल्या सर्व सर्वे यामध्ये विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यामध्ये विजयासाठी चुरस असून उबाठा गटाचे उमेदवार श्री नितीन सावंत हे तीन नंबरला राहत असल्याने त्यांच्या विजयाच्या शक्यता कमी आहे त्यामुळे ही उमेदवारी श्री सुधाकर घारे यांनाच मिळावे अशा प्रकारचे प्रयत्न झाले होते परंतु मातोश्रीवरून निघालेल्या आदेशानुसार ही उमेदवारी नितीन सावंत यांना दिली गेली व यामुळेच माथेरान मधील सर्व शिवसैनिक नाराज झाले असून त्यांनी आज  कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन आपण सर्वजण जाहीर राजीनामा देत आहोत असे जाहीर केले आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.