
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई । 151, बेलापूर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, घटक आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक हे उद्या सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
डी मार्ट रेडी, भुखंड क्रमांक आर -३ रिजेन्सी आएनसी समोरील चौक( कुकशेत गावाच्या मागे, पामबिच सर्व्हीस रोड शेजारी), सेक्टर 6, नेरुळ येथे सोमवारी दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बेलापूर विधानसभा मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यानंतर भव्य रॅली द्वारे आगरी कोळी भवन येथे महायुती मधील नेत्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेमधून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये प्रचंड असे उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण आहे. समाजसेवेला अधिक महत्त्व देत लोकसेवेची परंपरा पुढे नेणारे संदीप नाईक हेच बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समतोल विकास साधू शकतात, अशी खात्री असल्याने बेलापूर मतदार संघातील मतदारांनी त्यांचा दैदिप्यमान विजय साकारण्याचा निर्धार केला आहे. या निर्धाराची प्रचिती नामांकन अर्ज भरतेवेळी बेलापूरची जनता देणार आहे.