
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।वाशी, सेक्टर 14 मधील गोरक्षणाथ पालवे उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षांचा सिद्धार्थ विशाल उघड़े या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये मनपाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र असंतोष आहे
घटनेनंतर, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी जबाबदार अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकारामुळे मनपा प्रशासनातील सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उद्यानातील पाण्याच्या टाक्यांना सुरक्षेसाठी पुरेसे व्यवस्थापन नसल्याचे उघड झाले आहे. या निष्काळजीपणामुळे शहरातील पालकांमध्ये भीती आणि रोष पसरला आहे.
घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. यासह, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाण्याच्या टाक्यांसाठी योग्य सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिद्धार्थ उघड़ेच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर या प्रकरणावरून महानगरपालिकेची कार्यक्षमता आणि सुरक्षा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.