हॉटेल ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ मध्ये तंबाखूयुक्त हुक्का सर्व्ह, रात्री ४ पर्यंत सुरू असल्याची व्हिडिओ वायरल

  • Admin
  • नवी मुंबई
  • Nov 05, 2024

नवी मुंबई: सेक्टर ३०ए, वाशी येथे असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’(House Of Lords) हॉटेलमध्ये तंबाखूयुक्त हुक्का सर्व्ह करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून हुक्का लाउंज रात्री किमान ४ वाजेपर्यंत सुरू राहील, असे सांगण्यात येत आहे. त्याचे स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ वायरल होत आहे .

महाराष्ट्रामध्ये तंबाखूयुक्त हुक्का बार चालवण्यावर कडक निर्बंध असून, हुक्का व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ सर्व्ह करण्यास निर्बंध आहेत. तंबाखूजन्य पदार्थ सर्व्ह करताना ‘सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) २००३’ आणि राज्य शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विशेषतः अशा सुविधा उशिरा पर्यंत सुरू ठेवण्यास स्थानिक प्रशासनाचे परवानगीपत्र आवश्यक असते.जर या हॉटेलकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास, ग्राहक अथवा स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र यांच्याकडे याबाबत तक्रार करू शकतात.