अनोळखी इसमाचा दगडाने ठेचुन खुन, कक्ष-०३, गुन्हे शाखेकडुन २४ तासात उकल करुन आरोपी जेरबंद .
- Admin
- नवी मुंबई
- Nov 06, 2024
नवी मुंबई|नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये भारती विदयापीठ जवळील खारघर हील परिसरात डोंगरामध्ये एक अनोळखी इसमाचे प्रेत सापडले होते. त्याबाबत खारघर पोलीस ठाणे येथे दिनांक-०१/११/२०२४ रोजी अकस्मात मृत्यु रजिस्टर क्रमांक ६६/२०२४, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीमध्ये मयत इमसास दगडाने ठेचून मारण्यात आल्याचे दिसून आले होते.
सदर घटनेची माहिती प्राप्त झालेनंतर कक्ष-०३, गुन्हे शाखेकडून तात्काळ घटनास्थळी भेट देवून मयत इसमाची ओळख पटविण्याकरिता तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील येण्या-जाण्याचे मार्गाबाबत तांत्रिक तपास व गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्यपुर्ण व सखोल पद्धतीने चौकशी केली असता सदर मृत इसम हा एका व्यक्तीसोबत फिरताना आढळून आल्याने त्याबाबत कक्षाकडून चौकशी सुरु होती.
अनोळखी मयत इसमाबाबत केलेल्या तपासामध्ये कमल नथुराम ढोलपुरीया, वय ३६ वर्षे, राह. ठक्कर बप्पा कॉलनी, दोन नंबर पाडा, चेंबूर मुंबई मूळ राहणार बिखरन्या कला, बडी पादु थाना, तहसील - देगाना, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान हा इसम सदर मयत व्यक्तीसोबत फिरत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाव्दारे नमुद इसमाचा शोध घेतला असता तो नेहरुनगर, मुंबई येथे मिळून आला. त्यास पुढील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे सदर प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने मयत इसम नामे विकास रामलाल बोरा याने सहा महिन्यापुर्वी त्याचेकडून घेतलेले ३० हजार रुपये परत केले नसल्याचा राग मनात धरुन दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये सांगितले आहे.
सदर घटनेबाबत खारघर पोलीस ठाणे येथे दिनांक ०२/११/२०२४ रोजी गुन्हा रजि. कं. ३६४/२०२४, भा. न्याय संहिता कलम १०३, २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीस दिनांक ०२/११/२०२४ रोजी १७.५१ वा अटक करण्यात आली असुन, दिनांक ०८/११/२०२४ रोजी पर्यत सदर आरोपीची पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा पुढील आधिक तपास खारघर पोलीस ठाणे करीत आहे.
आरोपीचे नाव व पत्ता - कमल नथुराम ढोलपुरीया, वय ३६ वर्षे, राह. ठक्कर बप्पा कॉलनी, दोन नंबर पाडा, चेंबूर मुंबई मूळ राहणार - बिखरन्या कला, बडी पादु थाना, तहसील देगाना, जिल्हा नागोर, राज्य- राजस्थान.
आरोपीचा पुर्वइतिहास - नेहरुनगर पोलीस ठाणे, बृहन्मुंबई गु. रजि.क. ११५/२००८ भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे तसेच अजयकुमार लाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे वपोनि हनिफ मुलानी व सपोनि संतोष चव्हाण, सपोनि एकनाथ देसाई, पोउपनिरी आकाश पाटील तसेच पो. हवा/सावंत, पोहवा/सुधीर पाटील, पोहवा/राजकुमार दुधाळ, पोना/राजेश मोरे यांनी गुन्हयाचे तपासकामी महत्त्वपुर्ण कामगिरी करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.