ऐरोलीत आमदार गणेश नाईक आणि बेलापुरात माजी आमदार संदीप नाईक मजबूत स्थितीत
- Admin
- नवी मुंबई
- Nov 06, 2024
नवी मुंबई।माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक, महायुती (भाजपा-शिवसेना युती) चे उमेदवार म्हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघात मजबूत स्थितीत आहेत. त्यांना 43-47% मते मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) चे बंडखोर आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांचा 12-17% मतविभाग महायुती आणि महाविकास आघाडी (एमवीए) या दोन्हीच्या मतांमध्ये फटका देऊ शकतो, ज्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर मढ़वी यांना अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो एसे अंदाज वरिष्ट पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विश्वरत नायर यानी व्यक्त केले आहे ।
विश्वरत नायर यानी सांगितले की बेलापूर विधानसभा मतदारसंघात देखील असाच चित्र दिसत आहे. येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) उमेदवार संदीप नाईक यांना शिवसेना (शिंदे गट) चे बंडखोर आणि माजी अधिकाऱी विजय नहाटा यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नहाटा यांचे अंदाजे 10% मते महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या 43% मतांवर प्रभाव टाकू शकतात, ज्यामुळे संदीप नाईक यांचा 49% मतांचा अंदाज त्यांना विजयाच्या जवळ नेऊ शकतो.मात्र, निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित असत नाही. दमदार भाषणं आणि आश्वासनांनी मतदारांवर परिणाम होऊ शकतो. 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी काय घडेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.