नवी मुंबई। ऐरोली मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नव्या मुंबईचे शिल्पकार आणि जनतेत लोकप्रिय असलेल्या गणेश नाईक यांच्या प्रचाराला मिळालेल्या या समर्थनामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यतांना बळ मिळत आहे.
गणेश नाईक यांनी ऐरोलीत घेतलेल्या प्रचार रॅलीत महिलांपासून तरुणांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. गावागावातून सुरु झालेल्या या रॅलीने ऐरोली मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण रंगले असून, समर्थकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत शक्तिप्रदर्शन केले.
मतदारसंघातील नागरिकांचे प्रेम आणि पाठिंबा पाहता, २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत गणेश नाईक यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.