रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील गणेश नाईक - देवेंद्र फडणवीस

  • Admin
  • नवी मुंबई
  • Nov 13, 2024

नवी मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विश्वास व्यक्त केला की गणेश नाईक यांना नवी मुंबईत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय मिळेल. नाईक यांचं शहरासाठीचं योगदान अधोरेखित करताना फडणवीस म्हणाले, “गणेश नाईक हे नवी मुंबईचे शिल्पकार आहेत. त्यांनी शहराच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे.


फडणवीस यांनी असंही सांगितलं की, "ऐरोलीतील जागा सहज जिंकता येईल, आणि प्रचार सभा घेण्याचीही गरज नाही." नाईक यांचं पर्यावरण व जमिनींचं रक्षण करण्यासाठी असलेलं तळमळपूर्ण योगदानही त्यांनी अधोरेखित केलं.

महायुतीचे सरकार पुन्हा येणार

फडणवीस यांनी राज्यात महायुतीच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. “मी राज्याचा दौरा करतोय, आणि महायुतीचं सरकार पुन्हा येत आहे,” असं फडणवीस म्हणाले.

बंडखोरी करणाऱ्यांना इशारा

कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना इशारा देत म्हणाले, "आप भी अपनी ताकद अजमालो, अपनी हैसीयत समझमे आयेगी." त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना एक कुटुंब म्हणून काम करण्याचा सल्ला दिला आणि विजय सभेला हजर राहण्याचं आश्वासनही दिलं.