
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई। 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महायुती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांचा 90 हजार 411 विक्रमी मताधिक्याने विजय झालेला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये तब्बल 78 हजारांचे मताधिक्य घेऊन नाईक जिंकले होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचाच मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात लोकनेते गणेश नाईक हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले असून 2019 च्या निवडणुकीत 78 हजारांची असणारी आघाडी मोडीत काढत 90 हजार 411 मतांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभेची पहिली निवडणूक पार पडली. शिवसेनेच्या शिंदे गटातील विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्षाची वाट धरली होती. ऐरोली मतदार संघातील महायुतीच्या ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर मढवी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लोकनेते नाईक यांची 4 हजाराची नॉनस्टॉप लीड; 6 व्यांदा आमदार ऐरोली विधानसभा मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत लोकनेते गणेश नाईक 90 हजार 411 मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 1 लाख 42 हजार 273 मते मिळाली तर दुसऱ्या स्थानी अपक्ष विजय चौगुले यांना 51 हजार 862 मते, महाविकास आघाडी उबाठाचे उमेदवार मनोहर मढवी यांना 37 हजार 762 मते, मनसेचे निलेश बाणखेले यांना 16 हजार 725 त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना 8 हजार 612 मते मिळाली आहेत. ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या एकूण 32 फेऱ्या झाल्या 32 व्या राऊंड पर्यंत लोकनेते नाईक यांनी चार हजाराची आघाडी कायम ठेवत विजयाचा चौकार मारला आहे. लोकनेते नाईक हे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. या विक्रमी विजयानंतर प्रतिक्रिया देताना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभेतील सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. जनतेने आपल्याला विश्वास रुपी आशीर्वाद दिलेला आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्व क्षेत्रामध्ये देश प्रगती करत असून सर्व घटकांचे कल्याण होते आहे. देशामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण असून त्याचेच प्रतिबिंब महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपला पराभव लपवण्यासाठी विरोधक कारणे शोधत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.