महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अविनाश जाधव यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

पालघर: विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी पक्षाच्या प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.


समीर मोरे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य न मिळाल्याची तक्रार राज ठाकरे यांच्याकडे केली होती. तक्रारीनंतर काही तासांतच त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर आणि त्यांच्या भावावर हल्ला करण्यात आला.


      हल्ल्याचा आरोप

समीर मोरे यांनी ठाणे व पालघर जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५-२० जणांवर हल्ल्याचा आरोप केला आहे.हल्ल्यात जखमी झालेले आतिश मोरे (समीर मोरे यांचे भाऊ) गंभीर अवस्थेत असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


    आरोपांनंतर पदाचा राजीनामा:

या आरोपांनंतर अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे।मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज ठाकरे यांना प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी या वादाला "पक्षासाठी लज्जास्पद" म्हटले.अंतर्गत वादामुळे मनसेच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांची या प्रकरणावर काय भूमिका असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.