कोपरखैरणेतील रा. फ. नाईक विद्यालयात आमदार गणेश नाईक यांचा सत्कार समारंभ

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 07, 2024

नवी मुंबई .ऐरोली मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याच्या निमित्ताने कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्रमिक शिक्षण सेनेच्या वतीने आमदार गणेश नाईक साहेब यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमात आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित राहून सर्व शिक्षक, कर्मचारी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांनी शिक्षकवर्गाशी विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर संवाद साधला व शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान सतत सुरू राहील, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली. या सत्कार समारंभाने ऐरोली मतदारसंघातील विश्वास, प्रगती आणि विकासाचे प्रतीक ठरले आहे.