घणसोलीत ‘बांगलादेशी’ बिल्डरचा प्रताप: लोड बेअरिंगवर जीवघेणा ‘टॉवर’

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 08, 2024

नागरिकांच्या जीवाला धोका, मनपा अधिकाऱ्यांच्या कारवाईची प्रतीक्षा!

नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको एका बाजूने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असताना, घणसोलीत आचारसंहितेचा फायदा घेत बांगलादेशी बिल्डरने धोकादायक टॉवर उभा केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, घणसोली विभाग कार्यालयाजवळच हे अवैध बांधकाम सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकरण काय आहे?

घणसोली डी-मार्ट समोरील घणसोली गावात आणि घणसोली प्लाझा बिल्डिंगजवळ एका बांगलादेशी बिल्डरने सहा मजली इमारत उभी केली आहे. हे टॉवर पूर्णपणे लोड बेअरिंग तंत्रावर उभारण्यात आले असून, त्यामुळे इमारतीची स्थिरता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांवर आरोप

घणसोली विभाग कार्यालयाजवळच ही इमारत उभी असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. बिल्डर आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. भारत समाचार टीवी ला सूत्रांच्या कडून मिळाली माहितीनुसार, याच बिल्डरने घणसोली तलावाजवळही सात मजली अवैध इमारत उभारली आहे. तरीदेखील अधिकाऱ्यांनी डोळेझाक केलेली दिसते.

प्रमुख मुद्दे:

लोड बेअरिंगवर आधारित सहा मजली टॉवर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे.

संबंधित बिल्डरवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मनपा अधिकाऱ्यांवर आर्थिक संबंधांचा संशय.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात नाही.