१२ कोटींच्या ड्रग्ससह १५ नायजेरियन अटक

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 13, 2024

नवी मुंबई: नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या विशेष मोहिमेत १२ कोटी रुपयांच्या ड्रग्ससह १२ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन नायजेरियन नागरिकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या देशात राहण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती एसीपी भाऊसाहेब ढोले यांनी दिली.

शुक्रवारी सकाळपासून नवी मुंबईतील परिमंडळ १ आणि २ मध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान १२ नायजेरियन नागरिकांकडून १२ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले.तीन नायजेरियन नागरिक बोगस कागदपत्रांच्या आधारे राहत होते.

तपास आणि पुढील कारवाई:

सुमारे ५० नायजेरियन नागरिकांच्या पासपोर्ट व दस्तावेजांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही मोहीम सकाळपासून सुरू होऊन उशिरापर्यंत चालू होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत आणि आरोपींची संख्या आणखी वाढू शकते.

एसीपी भाऊसाहेब ढोले भारत समाचार टीवीसी म्हणाले, "ड्रग्स तस्करी आणि बेकायदेशीर नागरिकांविरुद्ध कडक कारवाईसाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांची ही कारवाई ड्रग्स तस्करी आणि बेकायदेशीर नागरिकांविरुद्धचा मोठा धडक आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून नवी मुंबईतील बेकायदेशीर घडामोडींवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.