कोपरखैराणेत भरधाव कारने दिली जोरदार धडक, दोन जण गंभीर जखमी, चालक फरार

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 20, 2024

नवी मुंबई .कोपरखैराणे रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी रात्री एका भरधाव Hyundai कारने Mahindra Force वाहन आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात 44 वर्षीय मोहम्मद गुट्टू मोहम्मद शेख आणि 24 वर्षीय नूर अहमद सिद्दीकी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.

सूत्रांच्या माहितीनुसार, कारचालक दारूच्या नशेत होता. हा अपघात चार भुजा स्वीट्ससमोर घडला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह

स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, कोपरखैराणे वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटनांना चालना मिळत आहे. रेल्वे स्थानकाच्या आसपास उशिरा रात्री रस्त्याच्या कडेला चायनीज गाड्यांवर मद्यधुंद गर्दी जमते, जी अशा अपघातांना कारणीभूत ठरते.

नवी मुंबईत नाकाबंदी मोहीमेत पोलीस प्रशासनाची उदासीनता?

दरवर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली रात्री नाकाबंदी आणि शोध मोहिमा राबवून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. मात्र, यावर्षी अशा मोहिमा कमी होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिकांच्या मते, यावर्षी पोलीस आयुक्त कार्यालय आणि वाहतूक विभागाने नाकाबंदी व शोध मोहिमा राबवण्याबाबत उदासीनता दाखवली आहे. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांचे प्रमाण वाढले आहे, जे अपघातांना कारणीभूत ठरत आहे.मद्यधुंद चालकांची संख्या वाढल्याने रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.स्थानिक रहिवाशांच्या मनात प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.

    स्थनिक नागरिकांची मागणी

नाकाबंदी मोहिमेचा पुनरारंभ: रात्री नियमित नाकाबंदी करून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी.

वाहतूक पोलिसांची सक्रियता दाखवत वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवावी.अपघात प्रवण भागांमध्ये सतत लक्ष ठेवले जावे.सुरक्षा उपाययोजना करण्यात यावे.पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या या मागण्यांकडे लक्ष देऊन पुन्हा सक्रियपणे मोहिमा राबवणे आवश्यक आहे, जेणेकरून रस्ते अपघात रोखता येतील आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

  पोलिस आणि वाहतूक विभाग लोकांचे प्राण गेल्यानंतर जागे होणार? नागरिकांचा सवाल

 कोपरखैरणे अपघातानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचे आरोप आहेत की पोलिस आणि वाहतूक विभाग मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात निष्क्रिय राहत असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे.स्थानिक नागरिकांनी सवाल केला आहे की, "पोलिस आणि वाहतूक विभागाला किती जणांचे प्राण गेल्यानंतर जाग येणार?" अपघात आणि निष्क्रियतेमुळे रहिवाशांमध्ये संताप आहे. रात्री नाकाबंदी आणि मद्यधुंद चालकांवर कारवाईच्या अभावामुळे अनेक कुटुंबांना संकटाला सामोरे जावे लागत आहे.पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने आता तरी जागे होऊन कठोर पावले उचलली नाहीत, तर आणखी किती निष्पाप लोकांचे प्राण जातील याचा विचार करावा," असे नागरिकांचे म्हणणे आहे.