
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई।कोपरखैरणे सेक्टर ७ मधील सम्राट नावाच्या २४ वर्ष जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरखैरने सेक्टर 7 सम्राट नावाची इमारत तळमजला व तीन मजले अशी असून २४ वर्षे जुनी आहे. पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटचा हॉलचा भाग अचानक खालील मजल्यावर कोसळला. या घटनेवेळी फ्लॅटमध्ये काही रहिवासी उपस्थित होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
पालिकेची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि इमारत तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले. पुढील आठ दिवसांत इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पालिकेच्या निरीक्षणानुसार, इमारतीची संरचना जीर्ण झाल्याने ही घटना घडली आहे. तसेच, भविष्यात अशा घटनांचा धोका टाळण्यासाठी सर्व जुनी व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांनी या घटनेमुळे चिंता व्यक्त केली आहे. काही कुटुंबांनी प्रशासनाच्या तातडीच्या सूचनांनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. मात्र, अचानकपणे राहत्या घरातून बाहेर पडावे लागत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे सूरही आहेत.
रहिवाशांचे म्हणणे आहे की इमारत जुनी झाली होती, परंतु नियमित देखभालीची आवश्यकता होती. जर वेळेवर उपाययोजना झाल्या असत्या, तर अशा घटना टाळता आल्या असत्या."
परिसरातील चिंता वाढल्या
घटनेमुळे परिसरातील इतर जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक इमारतींवर कारवाई करून पुनर्विकासाची प्रक्रिया जलद गतीने करण्याची मागणी केली आहे.
सुरक्षेसाठी प्रशासनाचे आवाहन
पालिकेने नागरिकांना जुन्या इमारतींच्या स्थितीबाबत तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. अशा धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील, असे प्रशासनाने सांगितले.