
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
कोल्हापूर|जुलै 2024 मध्ये झालेल्या दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनी ऐतिहासिक विशाळगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, गडावर प्रवेशासाठी प्रशासनाने काही कठोर अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करणे अनिवार्य असेल.
जुलै महिन्यात विशाळगड अतिक्रमण प्रकरणावरून उसळलेल्या दंगलीमुळे गड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.31 जानेवारीपासून गडावर पुन्हा प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासन गडावर मांसाहारी पदार्थ नेणे किंवा तिथे खाण्यास मज्जाव केले आहे।उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. संध्याकाळी थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे।संध्याकाळी ५ नंतर कोणालाही गडावर थांबण्याची परवानगी नाही. कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक आहे।कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य.गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस पडताळणी केली जाईल.शाहूवाडी तहसीलदारांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.विशाळगडाला भेट देताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि गडाच्या ऐतिहासिक व पर्यावरणीय वारशाचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे.