
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
अँफिबियस लँडिंग – संयुक्त मोहिमेचे प्रतीक
मुंबई: भारतीय सेना आणि नौदलाच्या संयुक्त AMPHEX 25 युद्धसरावात 91 इन्फंट्री ब्रिगेडने प्रभावी अँफिबियस लँडिंग सादर केली. INS जलश्वा जहाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या युद्धसरावाचे निरीक्षण केले.
या सरावात बंकर-बस्टिंग, मरीन कमांडो (MARCOS) यांचा कॉम्बॅट-फ्री फॉल, तसेच लँडिंग क्राफ्ट मेकॅनाइज्ड (LCM) आणि लँडिंग क्राफ्ट असॉल्ट (LCA) द्वारे सैनिक व BMP वाहने उतरविणे यासारख्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश होता. अखेरीस बीचहेड (सैन्य तळ) स्थापन करून मोहिमेचा यशस्वी समारोप करण्यात आला.
सुदर्शन चक्र कोरच्या ‘बायसन’ ब्रिगेड आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या समन्वयातून प्रशिक्षण, युद्ध कौशल्य आणि मिशन नियोजनातील सुसूत्रता यशस्वीरित्या प्रदर्शित करण्यात आली. AMPHEX 25 हा भारतीय सशस्त्र दलांच्या सागरी आणि किनारी युद्ध क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.