
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबईतील पामबीच गॅलेरिया मॉल मधील एका हुक्का बारमध्ये अल्पवयीन मुले हुक्का पित असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली असता, बार व्यवस्थापनाकडे DVR उपलब्ध नव्हता, ज्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे.
या प्रकरणात बार व्यवस्थापन, परवानाधारक आणि मुलांचे पालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप ठेवल्या गेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे –
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 287, 125, 45, 238, तसेच बालकांचे काळजी व सुरक्षा अधिनियम 2015 च्या कलम 77 आणि कोप्टा कायदा (तंबाखू नियंत्रण कायदा) कलम 4 अ, 21 अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हुक्का बारमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. तसेच, अल्पवयीन मुलांना सार्वजनिक ठिकाणी हुक्का किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थ देणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.