
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 29 व्या वर्धापन दिनी NMMT बसेस मधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना Online Smart Card योजना सुरू करण्यात आल्याचे मा.डॉ.कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा यांनी जाहिर करून नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरीकांना खुशखबर दिली आहे. मोफत प्रवासासाठी लागणारे Smart Card प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरीकांना नजिकच्या पास सेंटर किंवा तुर्भे आगारात जावून कागद पत्रांची पुर्तता करावी लागत होती.
आता नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा लाभ अधिक सुलभ व सोपा करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या NMMT Bus Tracker App वर सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास पाससाठी अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी एनएमएमटी पास केंद्रात जाण्याची गरज नाही.
Online Smart Card प्राप्त करून घेण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
1. NMMT Bus Tracker App वर ऑनलाइन अर्ज भरा.
2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
3. Online Smart कार्डसाठी लागणाऱ्या ₹50/- शुल्काचा भरणा केल्यानंतर सदर Smart Card पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.
मोफत प्रवासाकरिता Online Smart Card योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी घेण्याबाबत परिवहन प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.