ऐरोलीत गोळीबार,पोलिस घटनास्थळी दाखल,एक ताब्यात

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 13, 2025

नवी मुंबई .नवी मुंबईच्या ऐरोलीत आज गोळीबाराची घटना घडली असून, पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार दोन गटांमध्ये झालेल्या वादातून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. अधिक माहितीसाठी वाट पाहावी लागणार आहे.