सिडको विकसित विभागातील मिळकती अनधिकृत बांधकाम संदर्भात न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सिडको समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा!

  • Admin
  • नवी मुंबई
  • Mar 07, 2025

नवी मुंबई।सिडको हद्दीत तसचे गावठाण विभागातील सिडको विकसित केलेल्या मिळकती अनधिकृत बांधकामाचे दस्तावेज नोंदणी करू नये या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी प्रसाद भास्कर खळे हे सिडको भवन समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

सिडको विकसित केलेल्या मिळकती नवी मुंबईतील ऐरोली, ,घणसोली, कोपरखेरणे,तुर्भे, वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी उरण तालुक्यातील उलवे कामोठे, खारघर, कळंबोली, न्यु पनवेल, तळोजा, पनवेल आदी नोड्स मध्ये सिडकोने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड तसेच सोसायटी टेंडर भुखंड, रो हाऊस, सिडको आणि खाजगी निवासी संकुल ,एल आय जी, एस एस टाईप, अशी निवासी, दुकाने व कार्यालय यात मोठया प्रमाणावर अतिक्रमण करून सिडको विकसित केलेल्या मिळकती अनधिकृत बांधकामे झाली आहेत.

सिडको व नवी मुंबई महापालिकेच्या वतीने गावठाण विभागातील केलेल्या मिळकती अनधिकृत बांधकाम विरोधात तोडक कारवाई केली जाते परंतु सिडको वसाहतीत मिळकती अनधिकृत, अतिक्रमण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, त्या विरोधात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (१११/२०२२) दाखल करण्यात आली आहे.सदर जनहित याचिका सुनावणी करतांना गावठाण व सिडको विकसित विभागातील अनधिकृत बांधकामाचे दस्तावेज नोंदणी करू नये असे आदेश पारित केले आहेत. न्यायालयाच्या आदेश डावलून, अनधिकृत बांधकामाचे दस्तावेज नोंदणी केली जात असल्याने, न्यायालयाचा अवमान होत असल्याने,२३नोव्हेंबर २०२४ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेची अंमलबजावणी करावी यासाठी२१फेब्रुवारी२०२५ रोजी सिडको व महापालिकेला लेखी पत्र पाठवून विनंती करून देखिल त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी आपण येत्या१० मार्च रोजी सिडको भवन सीबीडी येथिल पदपथावर उपोषण करणार असल्याचे प्रसाद भास्कर खळे यांनी पत्रकार परिषदेत सागितले.


कोपरखैरने घनसोली विभागीय कार्यालयात वसाहत अधिकारी कटवते आणि क्लर्क परिहार यांचे कार्याचे विभागीय चौकसी करण्यात यावी आणि या पुढे असा अतिक्रमण झालेल्या सिडको चे घर किंवा दुकान यांचे हस्तांतरण शुल्क आकारले जाऊ नये व ट्रान्सफर करू नये .या संसदर्भात नोंदणी अधिकाऱ्यां मजाव करण्यात यावे