धारावीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होळी साजरी

  • Admin
  • मुंबई
  • Mar 14, 2025

आशिक अली

धारावी।हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण असणारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर धारावी पोलीस ठाणे हद्दीतील गौसिया मशीद समोर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येत हा रंगांचा सण साजरा केला. या प्रसंगी धार्मिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडला. यावेळी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत परस्परांप्रती सद्भावनेचा संदेश दिला.

धारावीसारख्या बहुसांस्कृतिक भागात साजरी होणारी ही समाज एकतेची होळी इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.