
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।नवी मुंबईतील युवा नेते निशांत करसन भगत (३ एप्रिल) व समाजसेवक संदिप करसन भगत (२) यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमाच्या आयोजनातून साजरा वाशी व सानपाडा परिसरात साजरा करण्यात आला.
भूमिपुत्र माथाडी कामगार व जनरल कामगार यूनियन, सोनखार स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, इच्छापूर्ती सामाजिक विकास मंडळ, इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब, एकविरा रिक्षा चालक मालक संघटना, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई स्टुडन्ट अँड युथ फाउंडेशन व तिन्ही नगरसेविका जनसंपर्क कार्यालयीन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने निशांत भगत व संदिप भगत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही दिवसांत अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये डॉ. प्रशांत थोरात यांच्या प्रभात ट्रस्ट च्या सहयोगाने वाशीगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध, वाशी स्टेशन टॉवर क्र. ४ जवळ रक्तदान शिबीर, मच्छिमार बांधवांना केंद्र सरकारचे बायोमेट्रिक नोंदीत केलेले NFDP स्मार्ट कार्ड प्रमाणपत्र वाटप, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्य उपचारासाठीचे ५ लाखांचे विमा कव्हरेज असलेले स्मार्ट कार्ड, अधिकाधिक नागरिकांना आयुष्यमान योजनेची नोंदणी व्हावी याकरिता नोंदणी कक्ष, वृक्षारोपण तसेच रयत शिक्षण संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तूंची भेट हे उपक्रम दिवसभरात राबविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे वाशीगाव येथील स्व. प्रेमनाथ पाटील चौक येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ आयोजन करण्यात आले होते, या अभिष्टचिंतन समारंभास नवी मुंबईतील जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद लाभले, माजी महापालिका विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी श्रीमती फशीबाई भगत, नगरसेविका वैजयंती भगत, रुपाली भगत यांच्यासह मुंबईतील भूमिपुत्र व मच्छीमार चळवळीत क्रियाशील असलेले जयेश आकरे, प्रमोद कोळी, नवी मुंबई, ठाणे, बृहन्मुंबई आणि पनवेल परिसरातील सहकार व भूमिपुत्र चळवळीतील कार्यकर्ते आणि वाशीगाव, सानपाडा - सोनखार, जुईनगर तिन्ही प्रभागातील नागरिक हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या आशीर्वाद पर शुभेच्छा देताना जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी वाशीगावातील भगत परिवार हे नवी मुंबईतील राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी एक आदर्श असल्याचे गौरोदगार व्यक्त केले, दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन्ही पुतणे निशांत व संदिप हे भगत बंधु जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत आहेत याबद्दल अन्य तरुणांनी आदर्श घेऊन अनुकरण करावे व जनमाणसांची सेवा करून जीवनाचा आनंद घ्यावा, जेणेकरून प्रती वर्षी वाढदिवसाच्या दिवशी केलेल्या जनसेवेचे प्रेम व आशीर्वाद शुभेच्छा रूपाने मिळते हे भाग्य दोन्ही बंधूना लाभत आहे असे देखील मत व्यक्त करून त्यांच्या पुढील जीवन प्रवासासाठी शुभकामना दिल्या.
दशरथ भगत यांनी शुभेच्छारुपी व्यक्त होतांना लोकनेते व राज्याचे वनमंत्री ना. गणेशजी नाईक साहेब यांच्या समर्थ पाठिंब्या मुळे नवी मुंबईतील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उभ्या केलेल्या प्रत्येक कार्याला समजून घेऊन त्यामागील लढ्यात सोबत उतरून बळ दिलेले आहे म्हणून जनतेचे प्रश्न सोडविताना भगत परिवाराला कुठलीही अडचण भासत नाहीये.
प्रश्न सुटून जनतेला आनंद मिळवून देत असल्याने प्रभागातील नागरिकांचा व विविध घटकांचा जिव्हाळा अधिक वृद्धिंगत होत असल्याचे देखील भगत यांनी म्हटले.