भीषण अपघातात एअरबॅगने वाचवली जीव!

  • Admin
  • नवी मुंबई
  • Apr 07, 2025

वाशीतील अरेंजा कॉर्नरजवळ पाम बीच रोडवर अपघात


नवी मुंबई ।वाशीतील अरेंजा कॉर्नरजवळ पाम बीच रोडवर रविवार रात एक वाजता एक भीषण अपघात घडला. घाटकोपर राहणार मोहफुज हे कार चालवत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट  समोरच्या  वेगणार कारला ठोककर मारली या धक्कादायक अपघातात कारचा चुराडा झाला, मात्र सुदैवाने एअरबॅग वेळेवर कार्यरत झाल्याने त्यांचा जीव वाचला.

दोन्ही कार मध्ये ड्रायव्हर किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये याच परिसरात एका ६ वर्षीय बालकाचा एअरबॅगमुळे मृत्यू झाला होता. कारच्या पुढच्या सीटवर बसवलेल्या त्या मुलावर अपघातावेळी उघडलेल्या एअरबॅगचा तीव्र परिणाम झाला होता.

वाहन चालवताना सुरक्षा नियम पाळा:
सुरक्षा तज्ज्ञांनी वाहन चालकांना सूचना दिली आहे की, लहान मुलांना नेहमीच मागच्या सीटवर बसवावे आणि योग्य चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टमचा वापर करावा. एअरबॅग्स हे जीव वाचवू शकतात, पण चुकीच्या वापरामुळे जीवावरही बेतू शकतात.