कश्मीरमध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घ्या!

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Apr 24, 2025

औरम सोसायटी में नागरिकों ने दी श्रद्धांजलि निर्देशने

नवी मुंबई ।जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या श्रद्धार्थ घणसोलीतील औरम सोसायटीमध्ये बुधवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं आयोजन सोसायटीचे योगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आलं.

या प्रसंगी कृष्णा पांडे, अनिल अहीर, गिरीश नायर, अश्विनी पाटील यांच्यासह सोसायटीमधील अनेक महिला, नागरिक आणि ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला.

योगेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "पहलगाममध्ये झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराचा सरकारने कठोरपणे बंदोबस्त करावा, अशी आमची अपेक्षा आहे. दोषींना कडक शासन व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे."

सभेदरम्यान हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं. नागरिकांनी एकजुटीने दहशतवादाचा निषेध केला व अशा हिंसक घटना देशाच्या शांततेला बाधा आणू शकत नाहीत, असा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी देशात शांतता व एकता अबाधित राहो, अशी प्रार्थना करण्यात आली.