
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई :- राज्यातली दुसरी श्रीमंत पालिका म्हणून ख्यातीप्राप्त नवी मुंबई महापालिका दिव्यांगांबाबत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई मनपाच्या स्थापनेपासून नवी मुंबईतील विविध दिव्याग संस्था व संघटना आम्हाला स्टोल्स मिळावेत म्हणून सातत्याने पाठपुरावा करित आहे . अखेर नोव्हेंबर 2019 मध्ये दिव्याग यांना स्टोल्स देण्याचे जाहीर करत सदर प्रक्रिया सुरू केली. दिव्यांगना आत्मनिर्भर होण्यासाठी स्टॉल वाटप कार्यक्रम मोठ्या दिमाखात केला होता. मात्र काही स्टॉल दिव्यांगला दिला आहेत. मात्र नेरुळ सह काही भागात हे स्टॉल बेवारस स्थितीत पडून असून अजून किती प्रतीक्षा करावी लागेल या चिंतेत दिव्यांग आहेत
नवी मुंबई मनपाच्या स्थापनेपासून सन 1992 पासून नवी मुंबई मनपाच्या प्रशासनाने दिव्यांगासाठी एकही धोरण राबविले नाही . 1995 साली मनपाचा लोकप्रतिनिधी कारभार सुरू झाला . नवी मुंबईतील दिव्यागसाठी धोरण राबवून त्यांना स्टोल्स मिळवून देऊन आर्थिक सबलीकरण करावे अशी मागणी मनपाच्या महासभेत वारंवार सर्वच पक्षांच्या नगरसेवकाकडून करण्यात आली . मात्र पालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत हा प्रश्न जैसे थे होता .
नवी मुंबईतील दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संघटनांनी स्टोल्स साठी 2016 पासून प्रयत्न सुरू केले होते . त्यानंतर सिडकोने येथील जागा मनपाकडे हस्तांतरित केल्यावर पालिकेने 2019 साली जाहिरात काढून दिव्यांगसाठी स्टोल्स देण्याची प्रक्रिया सुरू केली .मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनात ही प्रक्रिया पूर्णपणे थंडावली होती . विविध संघटनांनी नवी मुंबई मनपाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन 10 नोव्हेंबर 2022 रोजी दिव्यांगासाठी एकूण 330 स्टोल्स मंजूर करून त्यांची सोडत काढण्यात आली होती .त्यानंतर सोडतीद्वारे जागा व स्टोल्स वाटपाबाबतचे तात्पुरते सूचना पत्र संबंधित दिव्यांगाना देण्यात आले होते .मात्र स्टोल्स वाटपाची प्रक्रिया अद्यापही कासवाच्या गतीने सुरु आहे . एकूण 330 स्टोल्स पैकी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केलेल्या 258 दिव्यांगाना स्टोल्स सोडतीद्वारे ते देणे क्रंमप्राप्त आहे. मात्र दिव्यांग आणि मनपा यांच्यात करारनामा , स्टॅम्पपेपर , भाडेशुल्क आकारणी , सुरक्षा अनामत रक्कम , वारसाहक्क प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे
नमुंमपाने वाटप प्रक्रिया रखडवत ठेवल्याने दिव्यांगाना मिळणारे स्टॉल नवी मुंबईतील सार्वजनिक रस्त्यावर, मार्केट आवारात
बेवारस स्थितीत पडले आहेत . स्टोल्स मंजूर झालेल्या 258 दिव्यांगांना लवकरात लवकर सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून स्टॉलचे हस्तांतरण करून शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी त्वरित मोकळे करून द्यावेत.