
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई ।नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांना या जाहीर प्रकटनाव्दारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11, कलम 149(1) व 127 कलम 2 (क) अन्वये 'नमुंमपा कुत्र्यावरील कर नियमन 1993' ही उपविधी लागू करण्यात आलेली आहे. या उपविधीस शासन निर्णय क्र.एनएमसी 1692/410/सीआर48/92 नवि-20, दि.28 मे 1993 अन्वये शासन मान्यताही मिळालेली आहे.
सदर उपविधीनुसार विभाग कार्यालयांमार्फत श्वान परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येते. त्या अनुषंगाने सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ‘नागरिक सेवा’ सेक्शनमध्ये आरोग्य विभागाच्या सेक्शनला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनधिकृतपणे श्वान पाळणाऱ्या मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.