“भारतीय सैन्याचे शौर्य हे संपूर्ण देशाचे गौरव आहे” — वनमंत्री गणेश नाईक

  • Admin
  • नवी मुंबई
  • May 18, 2025

नवी मुंबई ।नवी मुंबई येथे श्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न नवी मुंबई प्रतिनिधी, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांचे प्राण घेतले. यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू करून अदम्य धाडसाने पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. पालघरचे पालकमंत्री आणि वनमंत्री श्री गणेश नाईक म्हणाले की, भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पराक्रमी भारतीय सैन्याचा सन्मान करण्यासाठी, आज नवी मुंबईत श्री नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

दहशतवाद्यांनी माता-भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकले, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लष्करी ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. या रॅलीचे यशस्वी परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या आणि राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याचे मूल्य वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. वाशी सेक्टर-२८ मधील ब्लू डायमंड हॉटेलपासून रॅलीची सुरुवात झाली. देशभक्तीने भरलेल्या या रॅलीत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान, "भारत माता की जय" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण परिसर तिरंग्याच्या सुगंधाने भरून गेला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व भारतीयांना विश्वास होता की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सैन्य योग्य उत्तर देईल. हवाई दल, लष्कर आणि नौदल या तिन्ही दलांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि हवाई पट्टे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याची सतर्कता आणि क्षमता जगाने पाहिली. देशातील जनता सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, ज्यामुळे त्यांचे मनोबल आणखी वाढले. आज संपूर्ण जग शक्तिशाली भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत आहे, असे श्री. नाईक म्हणाले. रॅलीचा समारोप वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यशस्वीरित्या झाला.या तिरंगा यात्रेत मध्ये माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, संदीप भगत हे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले

.