
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
पोखलेणखाली अडकलेला कामगार सुखरूप बाहेर
पनवेल। पनवेल सेक्टर 6E येथील जय श्रीकृष्ण कन्स्ट्रक्शन साइटजवळील धन्वंतरी हॉस्पिटल शेजारी एका पोखलेण मशीनखाली अडकलेल्या व्यक्तीला महापालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
आज शनिवार दिनांक १४जून सायंकाळी ७:५८ वाजता माजी नगरसेवक सतिश पाटील यांनी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांना या घटनेची माहिती दिली. कैलास गावडे यांनी तातडीने अग्निशमन दलाचे बोडके तसेच संबंधित प्रभाग अधिकारी आणि वैद्यकीय टीमला सूचना दिली. श्री बोडखे यांनीही तातडीने सर्व यंत्रणा सजग केली. अवघ्या पाच मिनिटात अग्निशमन दलाची यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आणि एक जीव वाचला.
घटनास्थळी पोहोचल्यावर जय श्रीकृष्ण कन्स्ट्रक्शन साइटवरील पोखलेण मशीनखाली अडकलेल्या विक्रम लंबाटे (साईट सुपरवायझर) यांना अग्निशमन जवानांनी हायड्रॉलिक स्प्रेडरच्या सहाय्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमी अवस्थेत त्यांना त्वरित ॲम्ब्युलन्सद्वारे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या रेस्क्यू मोहिमेत उपअग्निशमन अधिकारी मनीष ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली. घटनास्थळी कळंबोली पोलिस ठाण्याचे एपीआय श्री. ननावरे यांचीही उपस्थिती होती.
ही संपूर्ण कारवाई अवघ्या काही मिनिटांत यशस्वीपणे पार पडली. यामागे पनवेल महानगरपालिकेचे ( Panvel municipal Corporation )अधिकारी कर्मचारी यांची आपत्ती काळातील कार्य तत्परता व समन्वय महत्त्वाचा ठरला. या बाबत आयुक्त मंगेश चितळे यांनी अधिकारी -कर्मचारी यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.