
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
ठाणे।ठाणे शहरातील शिळफाटा ( shilphata ) परिसरात दिवसाढवळ्या बांधकाम साईटवरून तब्बल ₹15,000 किंमतीच्या 1.5 टन लोखंडी सळई चोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावत डायघर पोलीसांनी (daighar police ) तात्काळ कारवाई करत आरोपींना पकडले. ही घटना शुक्रवार, 08 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली असून तिघा ओळख पटलेल्या आरोपींसह दोन अनोळखी आरोपींवर BNS कायद्यातील कलम 303(2), 62 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार इमरान अब्दुल सत्तार शेख (वय 39, रहिवासी दोस्ती प्लॅनेट, शिळफाटा, ठाणे) हे हॉटेल व बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांची K.G.N. इंटरप्रायजेस ही कंपनी अटलांटा बिल्डिंग शेजारी, मुंब्रा-पनवेल रोड येथे नव्या इमारतीचे बांधकाम करत आहे. या ठिकाणी बांधकामासाठी आणलेली लोखंडी सळई काही दिवसांपासून पडून होती.
यापूर्वीही येथे चोरी झाल्याची घटना घडली होती, मात्र त्या वेळी शेख यांनी तक्रार केली नव्हती. परंतु 08 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्या मित्राकडून फोन आला की, साईटवर काही इसम सळई ट्रकमध्ये भरत आहेत.
तक्रारदार घटनास्थळी पोहोचले असता MH/05/BH/1136 क्रमांकाचा ट्रक आणि चार इसम दिसले. चौकशीत चालकाने आपले नाव मिस्त्री प्रसाद गौड असे सांगितले, तर सळई भरणारा इसम शाह आलम सलमानी असल्याचे समजले. पुढील चौकशीत हे काम *विजय गोरे यांच्या सांगण्यावरून होत असल्याचे उघड झाले.*
तक्रारदाराने सळई त्यांची मालकीची असल्याचे सांगून पोलिसांना कळवले. आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.
जप्त मालमत्ता 1.5 टन लोखंडी सळई ,अंदाजे किंमत – ₹15,000,वाहन – MH/05/BH/1136 (
डायघर पोलिसांनी मिस्त्री प्रसाद गौड (पत्ता: बुवापाडा, अंबरनाथ),शाह आलम सलमानी (पत्ता: भंगार गल्ली, अंबरनाथ) विजय गोरे (पत्ता: शिळफाटा, ठाणे) विरोधात डायघर पोलिस गुन्हा दाखल केले आहे .तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की,ही घटना तातडीने पोलिसांना कळवून तक्रारदाराने योग्य पाऊल उचलले, त्यामुळे आरोपी ताब्यात घेणे शक्य झाले. बांधकाम साईटवर होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवण्यात येणार आहे.सदर प्रकरणाचा तपास डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. चोरीच्या मालाचे मूळ आणि या रॅकेटमागील इतर लोकांची नावे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की सतर्क नागरिक आणि जलद पोलीस प्रतिसादामुळे मोठी चोरी टळू शकते. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनीही अशा घटनांपासून बचावासाठी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि तातडीचा पोलिस संपर्क क्रमांक ठेवणे आवश्यक आहे.