पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच करणार नवी मुंबईतील वाशी खाडी पुलाचे उद्घाटन
- Admin
- नवी मुंबई
- Sep 13, 2024
नवी मुंबई ।पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नवी मुंबईतील वाशी खाडी पुलाचे उद्घाटन करणार असल्याची शक्यता आहे. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तरगामी मार्ग (मुंबई ते नवी मुंबई) तयार असून अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. या तीन लेनच्या मार्गाचे उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. दुसरा पूल फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
एमएसआरडीसीने 2020 मध्ये या ट्विन-ब्रिज प्रकल्पाचे काम सुरू केले होते, ज्याची अंदाजे किंमत 559 कोटी रुपये आहे, आणि प्रतिष्ठित कंपनी L&T या कामाची अंमलबजावणी करत आहे. पुलाची एकूण लांबी 1.84 किलोमीटर असून त्याला जोडणारे रस्ते 1.22 किलोमीटर आहेत. नवीन टोल बूथही उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील आणखी एक मोठा प्रकल्प म्हणजे ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरची योजना आहे. हा 29 किलोमीटरचा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिमेला असलेल्या परिसराभोवती जाणार आहे आणि या नेटवर्कच्या एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) आहे.
या प्रकल्पाची अंदाजित किंमत 12,200 कोटी रुपये असून तो 2029 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. हा कॉरिडॉर प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडेल आणि कामगारांसाठी एक प्रभावी वाहतूक पर्याय उपलब्ध करून देईल. या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरूहो णार आहे.