Bharatsamachartv.com Exit Poll गणेश नाईक ,एकनाथ शिंदे ,संदीप नाईक आणि प्रशांत ठाकूर विजयी होणार

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Nov 21, 2024

 'या' मतदारसंघात 'हे' उमेदवार होणार विजयी, वाचा यादी- सर्व्हे

मुंबई. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान पार पडले. 60 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली असून, मतदानानंतर वेगवेगळ्या संस्था एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करत आहेत. Bharatsamachartv.com तर्फे निवडणूक निकालांबाबत अंदाज जाहीर केला असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये कोणता गट आघाडीवर राहणार, याबाबत प्राथमिक चित्र समोर आले आहे.


एक्झिट पोलचे आकडे:

महाविकास आघाडी (MVA):

मराठवाडा: 30 जागा

मुंबई: 18 जागा

उत्तर महाराष्ट्र: 23 जागा

ठाणे-कोकण: 17 जागा

विदर्भ: 31 जागा

पश्चिम महाराष्ट्र: 30 जागा

महायुती (BJP-शिवसेना गट व मित्र पक्ष):

मराठवाडा: 15 जागा

मुंबई: 18 जागा

उत्तर महाराष्ट्र: 21 जागा

ठाणे-कोकण: 18 जागा

विदर्भ: 29 जागा

पश्चिम महाराष्ट्र: 26 जाग

मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांना समान जागा (18) मिळण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

ठाणे-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात महायुती थोडी सरस असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसतो आहे.

एक्झिट पोलचे हे अंदाज निवडणुकीतील संभाव्य निकालांबाबत प्राथमिक संकेत देत आहेत. मात्र, प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.

'या' 20 महत्त्वाच्या मतदारसंघात हे उमेदवार जिंकणार

1. बारामती- महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ हा बारामती आहे. जिथे पवार विरुद्ध पवार असा सामना होता. पण या लढाईत काका अजित पवार हे पुतण्या युगेंद्र पवारवर भारी पडणार असा अंदाज प्रजातंत्रच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. 

2.ऐरोली - नवी मुंबईतील ताकतवर नेते म्हणून ओळखले जाणारे गणेश नाईक हे ऐरोलीतून भाजपच्या तिकिटावर निवडून येत असून, त्यांचेच शिष्य विजय चौघुले यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गुट बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत .

3.बेलापूर -नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे युवा नेते संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. संदीप नाईक निवडून येणार आहे. भाजपच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून संदीप नाईक निवडणूक लढवत आहेत. संदीप नाईक यांनी भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत.

4. सकोली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजयी होती असं सर्व्हेत म्हटलं आहे.

5. कोपरी-पाचपाखाडी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा मतदारसंघ बालेकिल्ला असून तेच पुन्हा येथून निवडून येतील असा अंदाज सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.

6. नागपूर दक्षिण-पश्चिम- मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधला आहे. त्यामुळे नागपूर द. प. मतदारसंघातून पुन्हा फडणवीस विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

7. वरळी- मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा असा समजला जाणारा वरळी हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश येईल असं सर्व्हेत म्हटलं आहे.

8. वांद्रे पूर्व- 'मातोश्री'च्या अंगणात शिवसेना (UBT)चा भगवा फडकणार असं सर्व्हेत म्हटलं आहे. कारण येथून वरुण सरदेसाई हे जिंकतील असं सर्व्हेत म्हटलं आहे. असं झाल्यास झिशान सिद्दीकी यांना हा मोठा धक्का असू शकतो. 

9. दादर-माहिम- महाराष्ट्रातील सर्वात चर्चेमध्ये असणाऱ्या मतदारसंघामध्ये दादर-माहीम हा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये शिवसेना (UBT) चे महेश सावंत हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं झाल्यास ते खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरू शकतात. कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

10. राहाता-शिर्डी- शिर्डी मतदारसंघ पुन्हा राखण्यात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेंना यश येईल असं सर्व्हेत म्हटलंय.

11. परळी वैजनाथ- मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असणारा परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांच्याकडेच राहीलं असा अंदाज सर्व्हेत दिला आहे. 

12. इंदापूर- दोन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या हर्षवर्धन पाटलांना पुन्हा इंदापूर काबीज करण्यात यश येईल असं सर्व्हेत म्हटलं आहे. जो दत्तात्रय भरणेंना धक्का असू शकतो. 

13. येवला- आपला पारंपारिक मतदारसंघ राखण्यात छगन भुजबळांना यश मिळू शकतं असा अंदाज या सर्व्हेत देण्यात आला आहे.

14. मानखुर्द-शिवाजीनगर- मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून अबु आझमी जिंकू शकतात. खरं तर नवाब मलिक यांनी इथून अबू आझमींना आव्हान उभं दिलं आहे. पण आझमी ही जागा राखतील असं सर्व्हेत म्हटलंय.

15. संभाजीनगर प- येथून राजू शिंदे हे विजय मिळवतील असा अंदाज देण्यात आला आहे. असं झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांना मोठा धक्का बसू शकतो.

16. कुडाळ- कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक हे पुन्हा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

17. भूम-परांडा- राष्ट्रवादी काँग्रेस राहुल मोटे हे मंत्री महोदय तानाजी सावंताचा पराभव करू शकतात असं सर्व्हेत म्हटलंय.

18. पनवेल - प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेतून निवडून येत आहेत.

19.उरण -महेश बालदी दुसऱ्यांदा निवडून येत आहेत.

20.बोरिवली -संजय उपाध्याय हे भाजपचे जुने कार्यकर्ते असून ते गोपाळ शेट्टी यांच्या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.