मुख्यमंत्री माझं पत्र वाचल्यावर सकारात्मक भूमिका घेतील: आमदार गणेश नाईक

  • Admin
  • नवी मुंबई
  • Sep 13, 2024

नवी मुंबई।नवी मुंबई महानगरपालिकेत 14 गावांचा समावेश करण्यास भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आपला विरोध दर्शविला आहे. नाईक यांनी सांगितले की, भौगोलिक दृष्ट्या या गावांची नवी मुंबईशी सलग्नता नाही. त्यामुळे शासनाने पारसिक डोंगरातून टनल बांधून गावांचा विकास करावा, तसेच लागणारा निधी देऊन विकास केल्यानंतरच गावांचा समावेश मनपामध्ये करावा.

नाईक म्हणाले की, "आम्हाला गावांचा समावेश करण्यास विरोध नाही, पण हा विकास आधी व्हायला हवा. यामध्ये कुठलेही राजकारण नाही." यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, मुख्यमंत्री हे पत्र वाचून सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.